उत्तराखंड डेहराडून: (गणेश माळवे) – 38 वी नॅशनल गेम्स उत्तराखंड येथे दि. 12 फेब्रुवारी रोजी

महिला दुहेरीत गटात: दिया चितळे व स्वस्तिक घोष महाराष्ट्र जोडीने  निथाया श्री मनी/ काव्य श्री बैस्सा (तामिळनाडू) च्या जोडीचा 3-2 सेट पराभव करत सुवर्णपदक प्राप्त केले.

महिला  दुहेरीत : अंतिम फेरीत : दिया चितळे/ स्वस्तिका घोष,(महाराष्ट्र)वि. निथाया श्री मनी/ काव्य श्री बैस्सा (तामिळनाडू) दरम्यान

6-11,8-11,11-9,11-7,11-6 महाराष्ट्र महिला  दुहेरी 3-2 सेट ने विजय प्राप्त करत सुवर्णपदक पटकावले.

महिला  दुहेरीत : उपांत्य फेरीत : दिया चितळे/ स्वस्तिका घोष,(महाराष्ट्र)वि. कौशिनीनाथ/ प्रिपती सेन (वेस्ट बंगाल)

9-11, 7-11, 11-5,12-10, 11-8  महाराष्ट्र महिला  दुहेरी 3-2 सेट ने विजय प्राप्त करत अंतिम फेरीत दाखल.

*षुरूष दुहेरीत: सिध्देश पांडे व रेगन अल्बुकर्क कांस्यपदक*

– पुरुष  दुहेरीत गटात

तामिळनाडू जोडी अंतिम फेरीत दाखल झाली तर उपांत्य फेरीत तामिळनाडू सोबत पराभूत झाल्यामुळे महाराष्ट्र चे सिध्देश पांडे व रेगन जोडीला कांस्यपदक विजेता ठरला.

पुरुष दुहेरीत गटात उपांत्य फेरीत  सिध्देश पांडे/ रेगन अल्बुकर्क (महाराष्ट्र) वि. सत्यन ज्ञानशेखर/अम्लराज (तामिळनाडू) 11-4, 7-11,12-14,9-11

तामिलनाडु 3-1 सेट विजयी होऊन अंतिम फेरीत दाखल.

महाराष्ट्र राज्य प्रशिक्षक सुनील बाब्रास, महेंद्र चिपळूणकर, संघ व्यवस्थापक म्हणून श्रीराम कोनकर,गणेश माळवे हे काम पाहत आहेत.

बक्षीस वितरण सोहळ्यास महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन सरचिटणीस नामदेव शिरगावकर,टे.टे. फेडरेशन उपाध्यक्ष चेतन गुरग, प्रिन्स विपोन, महाराष्ट्र राज्य पथक प्रमुख प्रा. संजय शेट्टे, स्मिता शिरोळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Source: Global Marathwada38 वी नॅशनल गेम्स टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत* *महिला दुहेरीत:दिया चितळे/स्वस्तिका घोष सुवर्णपदक*